धाराशिव (प्रतिनिधी)-अवैध मद्यविक्रेत्यानंतर शहर, जिल्ह्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वार पोलिस अधिक्षकांच्या रडारवर आले आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील 10 हुन अधिक दुचाकी व बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे. बुलेटसह दुचाकीचे सायलेन्सर काढणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटसह इतर वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

जिल्हाभरात वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 590 वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये कर्णकर्कश सायलेन्सर, ट्रीपल सीट, वाहन चालविण्याचा परवाना न बाळगणे, विनानंबर प्लेट अशा प्रकारे कायद्यांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 3 लाख 93 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


“अपहारण.”

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी कैलास शंकर चव्हाण, रा. जवळ नि. ता. परंडा जि. धाराशिव यांचा मुलगा ज्ञानेश्वर शंकर चव्हाण, वय 16 वर्षे रा. जवळ नि. ता. परंडा, जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.20.02.2024 रोजी शासकिय तंत्रनिकेतन कॉलेजच्या पाठीमागे धाराशिव येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी दिल्यावरून दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

बापु रावसाहेब कांबळे, वय 65 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.21.02.2024 रोजी 06.00 वा. पुर्वी राहाते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबद्दल त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या कारणावरून आरोपी बाबा नाना कांबळे, नाना ईश्वर कांबळे, संगीता ढवळे, महादु नायकिंदे, संतु आरसुळे रा. पाटसांगवी, अन्नपुर्णाबाइ या सर्वांनी मयत बापू कांबळे यांना व्याजाचे पैशाचे कारणावरुन  मानसिक त्रास दिल्याने आरोपींच्या जाचास व त्रासास कंटाळून बापू कांबळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा अविनाश बापु कांबळे, वय 31 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव, ह.मु. मोरीया हाउसिंग सोसायटी मोरे वस्ती चिखली पुणे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top