धाराशिव (प्रतिनिधी)-यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात भारतीय जनता पार्टीचे देशभरात नुकतेच गाव चलो  अभियान संपन्न झाले. महाराष्ट्रात देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यात आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य युवराज नळे यांनी शिंगोली तालुका धाराशिव या ठिकाणी प्रवासी कार्यकर्ता म्हणून 24 तास प्रवास करत असताना ग्राम संयोजक राहुल शिंदे, संतोष मगर यांच्या सह शिंगोली गावातील विविध नागरिकांच्या भेटी घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सांगत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. तसेच सामुहिक श्रमदानातून स्वच्छता अभियान, महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धा, युवक मंडळ, बचत गट यांच्या भेटी इत्यादी कार्यक्रम पार पाडत असताना त्यासोबत ग्रामपंचायत शिंगोलीच्या विंधन विहिरीचे तंत्रशुद्ध पद्धतीने पुनर्भरण करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे उन्हाळ्यात देखील सदरील विंधन विहिरीच्या पाण्याचा लाभ ग्रामस्थांना मिळू शकेल. या उपक्रमात युवराज नळे यांच्यासोबत ग्रामसंयोजक राहुल शिंदे, संतोष मगर व इतर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.


 
Top