नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रिमिअर लीग भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन ऐतिहासिक नळदुर्ग शहरात प्रथमच एपीएल च्या धर्तीवर माजी नगराध्यक्ष नय्यरभाई जहागिरदार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

नळदुर्ग शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरातील मरीआई मैदानावर भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा होत आहे. नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नय्यरभाई जहागिरदार व नळदुर्ग शहर भाजपाच्या वतीने भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार प्रीमिअर लीग भरविण्यात आले आहे. ही स्पर्धा 8 निमंत्रित संघामध्ये खेळविली जात आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या नियमानुसार खेळविली जात आहे.या स्पर्धेतील विजयी संघाला रोख 51 हजार रुपये व आमदार चषक, उपविजेत्या संघास रोख 25 हजार रुपये व आमदार चषक तर तृतीय क्रमांकाच्या संघास रोख 15 हजार रुपयांचे पारीतोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा 6 षटकांची आहे. या स्पर्धेतील आठ संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी चार ते पाच सामने खेळणार आहेत.

या स्पर्धेला 4 फेब्रुवारी पासुन सुरुवात झाली असुन दररोज चार सामने होणार आहेत. ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे. दि.4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यजदानी जहागिरदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगरसेवक संजय बताले, निरंजन राठोड,विनायक अहंकारी,भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,भजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार,भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, उपाध्यक्ष बबन चौधरी, शहर भाजपचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके,सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागिरदार, संजय विठ्ठल जाधव,मुदतर शेख, अबुअलहसन रजवी, रीपाईचे दुर्वास बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, पत्रकार विलास येडगे, सुनिल बनसोडे,प्रा. दीपक जगदाळे, दादासाहेब बनसोडे, आयुब शेख, विशाल डुकरे आदीजन उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचा स्पर्धेचे आयोजक माजी नगराध्यक्ष नय्यरभाई जहागिरदार यांनी सत्कार केला. यावेळी प्रस्ताविक करताना नय्यर जहागिरदार यांनी म्हटले की, यापुढील काळात यापेक्षाही मोठी आमदार लीग नाईट क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. शहरवासियांनी आम्हाला सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी म्हटले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सुनिल बनसोडे यांनी मानले. ही नाईट क्रिकेट स्पर्धा आहे सोर्धेची अतीशय चांगल्या प्रकारे माजी नगराध्यक्ष नय्यरभाई जहागिरदार यांनी तयारी केली आहे. मैदानावर विजेचे मोठमोठे टॉवर उभारण्यात आले आहेत. या भव्य लाईटमुळे मैदान उजळुन निघाले आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माजी नगराध्यक्ष नय्यरभाई जहागिरदार यांच्यासह एनजे ग्रुपचे सर्व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.


 
Top