धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा  कार्यालयात (दि. 09)  प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत  धाराशिव - उस्मानाबाद शहरातील मुस्लिम युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. धाराशिव शहरातील युसुफ काझी, सय्यद साद, बुऱ्हान शेख, माशायक अमीर, जाहेब शेख, नोमान काझी, रेहान सय्यद, अमीन सय्यद, इब्राहिम सय्यद, आसिफ शेख, सय्यद  यासिर यांचा जाहीर पक्षप्रवेश केला.

प्रशासनावर असलेली पकड, कामाचा वेग, वेळेला महत्त्व आणि काटेकोरपणा, रोखठोक बोलणे व कामाचा मोठा आवाका, अजित पवार यांच्या कामाचा झपाटा, विकासाची दृष्टी, राज्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत मुस्लिम युवकांनी पक्षांमध्ये प्रवेश केला. यापुढे जिल्हाध्यक्ष, प्रमुख नेते व पक्षाच्या मार्गदर्शनाखाली युवक, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविणे, पक्ष संघटन मजबूत करणे व पक्ष वाढीसाठी शहर, तालुका,जिल्ह्यामध्ये प्रयत्न करीत राहू व दिलेल्या संधीचे सोने करू असे त्यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले.

या पक्षप्रवेशावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, ज्येष्ठ नेते समीयोद्दीन मशायक, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष विक्रम कांबळे,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, माजी नगरसेवक भागवतराव कवडे,आदम शमशीर जमादार, शाहू धावारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top