धाराशिव (प्रतिनिधी)- येरमाळा येथील युवक व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन आ. राणाजगजिसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून अभ्यासिका व व्यायाम शाळेसाठी रुपये 50 लक्ष मंजूर झाले असल्याची माहिती विकास बारकुल यांनी दिली आहे.
येरमाळा व श्रीक्षेत्र येडेश्वरी देवस्थानच्या विकासासाठी आ. राणाजगजतसिंह पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. पालखी मार्ग व देवस्थानच्या विकासासाठी नुकताच रुपये 5 कोटी निधी देण्यात आला असून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. तसेच आई येडेश्वरी देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रुपये 5 कोटी निधी देण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांसह भाविक भक्तांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. गावातील विविध अडचणी व विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. राणाजगजिसिंह पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.