कळंब (प्रतिनिधी)- सन 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पा मध्ये गतवर्षी च्या तुलनेत आरोग्यसेवेसाठी 13% वाढीव निधी ची तरतूद केली असून एकंदरीत हा अर्थसंकल्प आरोग्य क्षेत्रासाठी आशादायक वाटतो. जनतेला विशेषतः ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग कॉलेजेस काढण्यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे. स्त्रीयामधील गर्भाशयाच्या कॅन्सर चे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एच पी व्ही लसीकरण करण्याची महत्वकांक्षी योजना अंमलात आणली जाणार आहे. असे केंद्रीय वित्तमंत्री म्हणाल्या हे विशेष. सन 2027 पर्यंत सर्वांना आरोग्य (हेल्थ फॉर ऑल) ही संकल्पना आमलात आणली जाणार आहे. आयुष्मान भारत ही योजना अंगनवाडी मदतनीस व आशा स्वयंसेविका यांच्यासाठी राबविण्यात येणार आहे. 

आरोग्य सेवेवर सध्या केवळ 1.2% जीडीपी खर्च केला जातो. एकंदरीत हेल्थ बजेट आशादायक असले तरी जोपर्यंत जीडीपी च्या 3 ते 5 % आर्थिक तरतूद केली जात नाही तो पर्यंत आरोग्य सेवा सुधारणार नाही. अशाप्रकार च्या सुचना आय एम ए च्या मुख्यालया (दिल्ली कार्यालय) तर्फे केंद्रीय आरोग्य मंत्री आणि वित्त मंत्र्यांना देण्यात आल्या होत्या .परंतु दुर्दैवाने तशी तरतूद केल्याचे आढळून येत नाही. एकंदरीत पाहता मुलींमधील लसीकरण मोहीम सोडता ईतर बाबतीत मात्र आजारी आरोग्य यंत्रणेला आश्वासनाचे आणखी एक सलाईन दिल्याचे दिसून येते.

डॉ. रामकृष्ण लोंढे, माजी प्रदेशाध्यक्ष आयएमए महाराष्ट्र राज्य 


 
Top