धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या 40 वर्षात धाराशिव शहरात व तालुक्यात पाटील यांनी लेदर पार्क, सुतगिरणी, मोपेड कारखाना, कुक्कुटपालन, तेरणा मेडिकल कॉलेज हे चालू करून अनेकांना रोजगार दिला अशी घणाघाती टिका ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी व सोमनाथ गुरव यांनी केली आहे.

सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषद पं. स. चे माजी उपसभापती शाम जाधव उपस्थित होते. सोमनाथ गुरव व सतीश सोमाणी यांनी नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या टिकेला प्रतिउत्तर दिले. सर्व्हिस रोड करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असताना राणा पाटील स्वतः श्रेय घेतेत. खासदारांनी व पालकमंत्र्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी बॅनर बाजी केली जाते. असे सांगून अधिकारी वर्गही वैतागला आहे असा आरोपही सोमाणी व गुरव यांनी केला. आमच्या बद्दल अधिकाऱ्यांसदर्भात आरोपी केल्याचे सांगून सोमाणी यांनी चांगले काम करून घेण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारणे आवश्यक आहे. कारण आम्ही कामाबाबत जनतेला बांधिल आहोत. काम चांगले होणे अपेक्षित असते. मोदीमुळे खासदार निवडून आले या आरोपाचा सोमाणी यांनी खासदारांनी मतदान केल्यामुळेच मोदी प्रधानमंत्री बनले. धाराशिवचे मेडिकल कॉलेज उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झाले आहे. त्यामुळे व कोणीही पोपटपंची करू नये असे सांगून पीकविमा, वसूल एजंटचा वसूल अधिकारी असे म्हणत पाटील व काळे यांच्यावर टिका केली.


 
Top