धाराशिव (प्रतिनिधी)- आज 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी पल्स पोलिओ लसीकरण टास्क फोर्सची सभा आणि सोबतच अडल्ट बीसीजी व्हॅकसिन व टीबीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेबाबत डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये प्रस्तावीत ऍडल्ट बीसीजी व्हॅकसिनबाबत सखोल चर्चा करण्यात आली.तसेच सुरु असलेल्या टीबीमुक्त पंचायत मोहिमेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी जिल्ह्यातील इतर विभागांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या.या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास,  प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी,सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक, डब्लू एच ओ चे प्रतिनिधी व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील एकूण 71 टीबी फ्री ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय पडताळणी समितीकडून पात्र ठरविण्यात आले. राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी तेरा जिल्ह्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश टीबी मुक्तीकडे यशस्वीपणे वाटचाल असा होत आहे म्हणून सबनॅशनल सर्टिफिकेशनसाठी धाराशिव जिल्ह्याची निवड तसेच रौप्य  पदकाचा स्पर्धक म्हणून राष्ट्रीय स्तरावर वाटचाल सुरू आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ रफिक अन्सारी यांनी धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या टीबी मुक्त पंचायत मोहिमेविषयी विस्तृत माहिती दिली.जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी अडल्ट बीसीजी व्हॅकसिन संदर्भात विस्तृत माहिती सादर केली.


 
Top