तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील अंगणवाडी क्रमांक 14 मध्ये छत्रपती शिवजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून बालकांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे यांनी बालकांना माहीती  सांगितली. यावेळी आनिता गायकवाड, पायल गायकवाड, वर्षा गायकवाड, चंदाराणी पौळ,शितल पेठे,आरती गायकवाड, आणि अंगणवाडी कार्यकर्ती रोहीणी कांबळे,प्रभावती वाघमारे, अर्चना सोनवणे, सरोजा वाघमारे, मदतनीस महादेवी शिंदे, रेणुका शिंदे आदी उपस्थित होते.


 
Top