धाराशिव (प्रतिनिधी)- संजीवनी विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षा इंटरमिजिएट 2024 चा निकाल  आँनलाईन पध्दतीने जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल 100% लागला. विद्यालयातून एकूण 22विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, यापैकी 79 विद्यार्थी यांना ब श्रेणी मिळाली असून, 13विद्यार्थी यांना क श्रेणी मिळाली आहे. सदर विद्यार्थ्यांना कलाशिक्षक बोराडे सर यांनी मार्गदर्शन केले होते.विद्यालयाचा निकालाबाबत मुख्याध्यापिका श्रीमती रेखा शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


 
Top