तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपरिषद मध्ये श्रीमती पुष्पांजली दत्तात्रय मंगरुळे या रचना सहायक, गट-ब पदावर रुजू झाल्या आहेत. पुष्पांजली मंगरुळे या जुळ्या सोलापूर येथील असुन त्यांची ही पहिलीच अर्पारमेंट आहे.

पुष्पाजंली मंगरुळे यांची  नियुक्ती श्रीक्षेञ तुळजापूर विकास आराखडात मोलाची असणार  आहे. मा. संचालक नगर रचना राज्य पुणे यांच्या आदेशाने त्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 वरील पदावर रुजू झाल्या. मुख्याधिकारी श्री.लक्ष्मण कुंभार यांनी त्यांचे स्वागत केले. तुळजापूर नगरपरिषदे मधे संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. सदर पदभरती मुळे नगररचना विभागाची कामे गतीने मार्गी लागणार आहेत. या वेळी कार्यालय अधीक्षक श्री.वैभव पाठक व नगर अभियंता अशोक सनगले व श्रीमती मंगरुळे यांचे आई, वडील व इतर नातेवाईक उपस्थित होते.


 
Top