तुळजापूर (प्रतिनिधी)- शासनाने राज्यात सरकारी रुग्णालयात मानवावर मोफत उपचार केले जातात त्याच धर्तीवर पशुंवर मोफत उपचार पशु वैद्यकीय दवाखान्यात करण्यात यावेत अशी मागणी भाजप कार्यकर्ते मकरंद लबडे यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
पशुसंवर्धन अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधीच अवकाळी नंतर दुष्काळ पडला असून, पाणी आणि चारा यांची टंचाई जाणवत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या धर्तीवरती पशुंची आरोग्य तपासणी किंवा उपचारासाठी सुद्धा सर्व पशुवैद्यकिय दवाखान्यांमध्ये ओपीडी फीस बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन, मंगरूळ येथील भाजप कार्यकर्ते मकरंद लबडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिले.