धाराशिव (प्रतिनिधी)-प्रशासनाने केलेले कार्य पत्रकारांच्या माध्यमातून जनतेसमोर जाते. पत्रकारांनी समाजातील विविध प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला माहिती मिळते. धाराशिव जिल्ह्याची पत्रकारिता सकारात्मक, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केल़े

शहरातील पत्रकार भवन येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त शनिवारी (दि.6) आयोजित  प्रतिमापूजन व मार्गदर्शन सोहळा  उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी ड़ॉ ओंबासे बोलत होते.  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज़िप़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती होत़ी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर सरचिटणीस संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे म्हणाले,  काही पत्रकार सोडले तर अनेकजणांची आर्थिक क्षमता जेमतेम आह़े त्यामुळे अशा पत्रकारांनी छोटा, मोठा व्यवसाय सुरू करून अर्थकारणाकडेही लक्ष द्याव़े भविष्याच्या दृष्टीने पेन्शन प्लॅन, आरोग्य विमा या संदर्भातील नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केल़े प्रारंभी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींसह मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास  सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अब्बास सय्यद, तालुकाध्यक्ष सुभाष कदम (धाराशिव),  अंबादास पोफळे (तुळजापूर), सुरेशकुमार घाडगे (परंडा), प्रमोद कांबळे (भूम), गौतम चेडे (वाशी), जिल्हा संघटक विनोद बाकले, दीपक जाधव, मल्लिकार्जुन सोनवणे,  प्रवीण पवार, संतोष शेटे, सुरेश कदम,  पार्श्वनाथ बाळापुरे, शरद गायकवाड, उमाजी गायकवाड, सल्लाउद्दीन शेख,दौलत निपाणीकर, प्ऱा सतीश मातणे, किशोर माळी, अजित  माळी, निजाम शेख, जयराम शिंदे, बालाजी लोखंडे, सुरेश कदम, हरी खोटे, फैसल शेख, राहुल कोरे, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव पुजारी, गणेश माळी, शहारूख सय्यद, दिपक सावंत, प्रशांत गुंडाळे, काकासाहेब कांबळे, संतोष बडवे,  संतोष खुणे, हुकमत मुलानी आदीसह जिल्ह्यातील पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकार संघाचे सरचिटणीस श्ऱी जाधव यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आल़ा कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस श्ऱी जाधव यांनी तर भैरवनाथ कानडे यांनी आभार मानल़े


जिल्ह्याच्या विकासासाठी कार्य करा

पत्रकार समाजातील विविध प्रश्न आपल्या लेखणीतून मांडत असतात़ त्यामुळे आम्हाला मार्ग काढण्यास मदत होत़े पत्रकारांनी प्रशासनाच्या सोबत राहून जिल्ह्याच्या विकासासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन ज़िप़ मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केल़े


गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न

गुन्हेगारांना गुन्हेगारी वृत्तीपासून प्रवृत्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत़ त्या अनुषंगाने पोलीस दलाच्या वतीने पहाट कार्यक्रम राबविण्यात येत आह़े पत्रकारीतेच्या माध्यमातून आमचे काम जनतेसमोर येत आह़े पत्रकार लोकशाहीला पोषक अशी सकारात्मक पत्रकारीता करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केल़े


 उत्कृष्ट कार्याची परंपरा अखंडीतपणे सुरू ठेवा

जिल्हाधिकारी ड़ॉ ओंबासे, ज़िप़ मुख्य कार्यकारी अधिकारी श्ऱी गुप्ता व जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या प्रशासनातील त्रिमुर्तींच्या माध्यमातून जिल्ह्याची सेवा घडत आह़े  या त्रिमुर्तींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राची सेवा घडावी, अशी अपेक्षा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी व्यक्त केल़ी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उत्कृष्ट कार्याची परंपरा पत्रकारांनी कायम व अखंडीतपणे सुरू ठेवावी, असे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष श्ऱी रणदिवे यांनी केल़े


 
Top