तेर (प्रतिनिधी)-अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या विविध मागण्यासाठी चालू असलेल्या संपास पाठींबा देण्याची मागणी तेर येथील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांनी निवेदनाद्वारे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे  केली.

4 डिसेंबरपासून अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस यांनी कामाचे स्वरूप पाहता मानधन वाढ करावी, सेवा निवृत्ती नंतर मासिक पेन्शन मिळावी, सेवा निवृत्ती नंतर ग्रॅजयुटी मिळावी, आहाराचा दर्जा वाढविला पाहिजे या मागणीसाठी अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस 4 डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. आ.राणाजगजितसिंह पाटील  तेर येथे आले असता तेर येथील अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांनी त्यांची भेट घेऊन संपास पाठींबा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.


 
Top