तुळजापूर (प्रतिनिधी)- जळकोट बीट अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत 50 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून प्रयत्न करू अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी दिली. 

आलियाबाद (जळकोट) येथील राजर्षी शाहू महाराज कला, विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद, धाराशिव व पंचायत समिती, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जळकोट बीटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश चव्हाण हे बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाराज कला, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष चव्हाण हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे

म्हणून पत्रकार मेघराज किलजे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात होर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख अरुण अंगुले यांचा सेवानिवृत्ती निमित्त तर मानमोडी येथील विक्रम पाचंगे यांना राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर बोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल करदुरे, होर्टीचे केंद्रीय मुख्याध्यापक विजयकुमार चव्हाण, बोरगावचे केंद्रीय मुख्याध्यापक डी. एस. वाघमारे, जळकोटचे केंद्रप्रमुख परमेश्वर शिंगाडे, शिक्षक संघटना प्रवक्ते उमेश भोसले, शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ इटकरी जे. व्ही. शिंदे, गिरी आदि उपस्थित होते. सलामीचा उद्घाटनाचा सामना जळकोट व हंगरगा शाळेच्या मुलींच्या खो-खो सामन्याने झाला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंडित कदम, बालाजी पाठक, एस. जे. कणसे, पी. एल. तलमोडे, बी. एम. माशाळकर, श्रीमती

बी. के. महानुर, ए. ए. सावंत, वि. टी. चव्हाण, डी. एस. रेणुके, रायखेलकर, डी. एम. कुडकले, हरिदास शिंगाडे, महाबोले, वैरागी, बनजगोळे, एस. जी. अभिवंत, एस. पी. कुलकर्णी, एम.बी. चौगुले, पटेल, गणेश कोळी, भोजने, डी. एस. वनवे, युवराज जाधव, अनिल जाधव, एम. एम. घोडके, मनोज चौधरी, एम. बी. लष्करे आदि शिक्षक परिश्रम घेत आहेत.


 
Top