उमरगा (प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने येथील नगर पालिके समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून क्रांतिजोती सावित्रीबाई फुलें यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली.

या वेळी रिपाइंचे नेते हरिष डावरे, एस.के. चेले, रिपाइंचे महिला आघाडी तालुका अध्यक्षा आशाताई कांबळे, तालुकाध्यक्ष दगडू भोसले, वंचीत आघाडीचे रामभाऊ गायकवाड, अडँ हिराजी पांढरे, शहाजी मस्के, वैजिनाथ सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, जीवन सूर्यवंशी, बलवान भोसले, कवी गुणरत्न भालेराव, माणिक कांबळे, सोजरबाई सोनकांबळे, उषा खंडांगळे, चित्राबाई सोनकांबळे, मंगलबाई कांबळे, फुलाबाई सोनकांबळे, बबिता माने आदी कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


 
Top