उमरगा (प्रतिनिधी) -ग्रामीण भागातील शेतकरी व पशु पालकांना बिरुदेव मंदिर परिसरात भरविण्यात येणाऱ्या यात्रेतून मोठया प्रमाणात लाभ होत असतो. या ठिकाणी येणारे शेतकरी आपल्या शेतात शेती करण्यासाठी बैलाची खरेदी करून शेती सुजलाम सुफलाम करीत असतात. आगामी काळात शेती व शेतीशी निगडित व्यवसाय व पशु पालकांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी मदत केली जाणार असल्याचे मत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले.

शहरातील बिरुदेव मंदिर परिसरात कृषिउत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात आलेल्या पशु प्रदर्शन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे,एम.ए.सुलतान, सभापती रणधीर पवार,भाजपचे तालुका अध्यक्ष शहाजी पाटील,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बळीराम सुरवसे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार, जकेकुरचे सरपंच अनिल बिराजदार, उपसभापती राजेंद्र तळीखेडे, पशु प्रदर्शन सभापती कृष्णा माने, सचिव सिद्धप्पा घोडके आदींची उपस्थिती होती.

यावेळी जितेंद्र शिंदे, प्रा. सुरेश बिराजदार यांचे भाषण झाले. तर अध्यक्षीय समारोप प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केला. कार्यक्रमास औश्याचें माजी नगराध्यक्ष अल्लीसे कुरेशी, महावीर कोराळे, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद काळे, शरद माने, बालाजी महावरकर, शंकर पाटील, दत्तू कटकधोंड,राजेंद्र सुर्यवंशी, बालाजी मिरकले, मधुकर घोडके, परमेश्वर दळगडे, शिवाजी माकने, सुभाष गायकवाड, आदींनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले तर उपसभापती राजेंद्र तळीखेडे यांनी आभार मानले.


 
Top