ताज्या घडामोडी



तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर पानीपतच्या रणभूमीवर कर्तुत्व गाजवुन मातीत मिसळलेल्या पुर्वजांच्या स्मृतीना अभिवादन करण्यासाठी शहरातील दिपक चौकात रविवार दि.14 जानेवारी रोजी सांयकाळी मेणबत्ती प्रज्वलित करुन अभिवादन करुन मराठा शौर्य दिन साजरा करण्यात आला .

यावेळी नगरसेवक रंणजित  इंगळे स्वराज्य संघटना जिल्हाअध्यक्ष महेश गवळी  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुहास गायकवाड, श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ माजी कार्यकारणी सदस्य कुमार इंगळे, शहाजी भांजी, मराठा क्रांती मोर्चाचे कुमार टोले, स्वराज्य संघटनेचे सत्यजीत साठे, स्वराज्य संघटना राज्यप्रवक्ते जीवनराजे इंगळे, दत्ता सोमाजी, चंद्रकांत पवार, आनंद काळे, चंद्रकांत सप्ताळ, दादा अनदुरकर, तुकाराम ढेरे, सुनील आवटी, बापू परदेशी, ओंकार हंगरगेकर, दिलीप नाईकवाडी, नागनाथ इंगळे आदीसह असंख्य बांधव उपस्थित होते.


 
Top