धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणुन त्यांचा जन्मदिन दि. 15 जानेवारी हा या पुढे दरवर्षी “राज्य क्रीडा दिन” म्हणुन साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि श्रीपतराव भोसले हायस्कुल, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य क्रीडा दिनाचे आयोजन श्रीपतराव भोसले हायस्कुल येथे करण्यात आले. याराज्य क्रीडा दिनाचे उद्घाटन तहसिलदार. डॉ. शिवानंद बिडवे यांचे हस्ते ऑलिम्पीकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाले. यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी डॉ. चंद्रजीत जाधव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडाळाचे प्रशासकीय अधिकारी, अदित्यभैय्या पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, प्राचार्य साहेबराव देशमुख , उपप्राचार्य संतोष घारगे, क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे, विवेक कापसे, अमित लोमटे, राजाभाऊ पवार, प्रदिप सुर्यवंशी,अभिजीत पाटील कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या कार्याची माहिती खेळाडूंना दिली. तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी डॉ. चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रामधील संधीबाबत बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी आजच्या धक्काधिकीच्या जीवनात खेळाचे महत्वाची माहिती खेळाडूंना देऊन अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. संदिप जगताप यांनी केले व कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक, सिध्देश्वर कोळी यांनी मानले.
राज्य क्रीडा दिनाच्या औचित्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जे 15 जानेवारी, 2024 या कालावधीत खो-खो, कराटे, तायक्वांदो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दीबळ, फुटबॉल, शुटींग, हॅण्डबॉल, रिंगटेनिस, मैदानी, स्केटिंग, आर्चरी, ज्युदो, वुशू, व्हॉलीबॉल इत्यादि खेळाच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थायेथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार तसेच विविध स्पर्धेत प्रविण्य संपादन केलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.