धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव इ. 7 वी विभागाची प्रशालेच्या वतीने स्थानिक पर्यटन स्थळांची विद्यार्थांना माहिती होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख उपमुख्याध्यापक एस. बी. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सहलीचे आयोजन 7वी पर्यवेक्षक  आर.बी. जाधव यांनी केलेल्या सहलीत विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. 

कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी विद्यार्थ्यांना  हातलाई देवीचे माहात्म सांगून डोंगरा विषयी माहिती सांगून याठिकाणी वावर विविध प्राण्यासह औषधी वनस्पती उपलब्ध आहेत अथ्या प्रकारे माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हातलाई डोंगरावर खेळण्याचा आनंद घेऊन वनभोजनासह शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. परिसर भ्रमण केले व येता जाता हातलाई डोंगर पायी चढउतार करून अनुभुती घेतली.  सहल यशस्वीतेसाठी शिक्षक डी.एस. शिराळ, बी.टी. गवळी, एस.ए.राठोड, एस.एस. चद्दे, एस.एन. धोंगडे, वाहतुक प्रमुख शुभम मुंडे, चालक नितीन नाईकवाडी यांनी परिश्रम घेतले.


 
Top