धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन जिल्हृयतील पारधी व इतर आदिवासी समाजातील युवकांना गुन्हेगारी पासून परावृत्त व मुख्य  प्रवाहात आणणेसाठी “पहाट” उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आहे. याच उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम म्हणून दि. 22. जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 राजी दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे पारधी व इतर समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात पोलीस अधीक्षक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून 4 कंपन्यानी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये प्रथम इज्युकेशन फांऊडेशन, मुंबई, जीवन विमा निगम, धाराशिव, एस. बी. आय. कार्डस, नोहो करिअर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपन्या सामील झाल्या आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पहाट कार्यक्रमातंर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असनू, पारधी व इतर समाजातील युवक-युवतींसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पोलीस विभाग कटीबध्द असलृयाचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक- युवतींनी सदर मेळाव्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

तसेच सदर कार्यक्रमास सहायक आयुक्त, कौशल्य विकास धाराशिव संजय गुरव यांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे प्रशिक्षक ईस्माईल तंटे यांनी बेरोजगार युवक-युवतींसाठी असलेल्या कौशल्यपुर्ण रोजगाराबाबत माहिती देवून त्यातुन होणाऱ्या रोजगार निर्मीती बाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या केसेसची माहिती दिली. सदर मेळाव्यास जिल्ह्यातुन 400 ते 500 बेरोजगार युवक- युवतींनी सहभाग नोदंविला असुन त्यांना रोजगार मिळवून देण्याची कार्यवाही सहभागी कंपन्यांमार्फत सुरु करण्यात आलेली आहे. 

सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, सहायक आयुक्त कौशल्य विकास धाराशिव संजय गुरव, प्रथम एज्युकेशन फांऊडेशन मुंबईचे प्रशिक्षक ईस्माईल तंटे, जीवन विमा निगम धाराशिवचे डेव्हलपमेन्टं ऑफीसर श्रसिध्दांत मेटकर, एस. बी.आय कार्डचे प्रतिक ढावारे, सुरज सुरवसे तसेच नोहो करिअर प्रायव्हेट लिमीटेड मुंबईचे मानव संसाधन विभाग प्रमुख दत्तात्रय पुरी हे उपस्थित होते.


 
Top