धाराशिव (प्रतिनिधी)-टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई- तुळजापूर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तडवळे कसबे येथे  ग्रामीण सामुदायिक भेट, सामुदायिक जनसुनावणी व कायदेशीर मार्गदर्शन शिबीरा प्रसंगी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश -1 राजेश गुप्ता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण धाराशिव वसंत यादव, सरपंच श्रीमती स्वाती जमाले, ग्रामसेवक आडे, टिसचे डॉ. देवकुमार जेकब, कार्यक्रम समन्वयक गणेश चादरे, आदिवासी सामाजातील जेष्ठ कार्यकर्ते शंकर पवार, आबा पवार, नाना पवार, पळसव सरपंच सिध्देश्वर काळे व (अक्सेस टू जस्टिस) स्कुल ऑफ लॉ, राईटस ॲड कॉन्स्टिटयुशन गव्हर्नन्स टीस मुंबईचे विद्यार्थी व अधिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले की, धाराशिव जिल्हृयातील आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी रोजगार मेळावा, आरोग्य शिबीर, शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती कार्यक्रम व त्यांच्या मुलभुत समस्या सोडवण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने केलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त होत आहे. हा समाज बदलत असल्याचे समाधान व्यक्त केले. या कार्यात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे मोठे सहकार्य मिळत आसल्याचे सांगितले. या प्रसंगी राजेश गुप्ता, अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश-1 म्हणाले की, आदिवासी समाजातील मुलामुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे. शिक्षण हे कौटुंबिक प्रगती व देशाच्या प्रगतीसाठी महत्वपुर्ण असल्याचे सांगितले. या प्रसंगी वसंत यादव यांनी जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी समाजातील शंकर पवार, आबा पवार, नाना पवार, सिध्देश्वर काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. आणखीन मोठ्या प्रमाणात समाजाला विविध योजनांचा लाभ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गणेश चादरे म्हणाले की, टीसच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातुन करण्यात येणाऱ्या विविध अभ्यासाचा फायदा आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पडेल असा आशावाद व्यक्त केला. डॉ देवकुमार जेकब यांनी अभ्यास भेटीचा उद्देश सांगून कायदेविषयक मार्गदर्शन केले. टीच विद्यार्थी यांनी ही यावेळी शिक्षणाचा अधिकार, मुलांचे अधिकार, बालविवाह या विषयांर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार केतन पवार यांनी मानले.


 
Top