भूम (प्रतिनिधी)-आयोध्या  रामजन्मभूमी येथे प्रभू श्रीराम  प्राण प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने भूम शहरातील प्रत्येक मंदिर ठिकाणी महाआरती करून महाप्रसाद म्हणून सकल हिंदू समन्वय समितीने दिलेल्या 11 हजार लाडूचे वाटप करून प्रभू श्रीरामचा जयजयकार करण्यात आला.

सोमवार दि 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथे प्रभू श्रीराम प्रतिष्ठापणा झाली. या संदर्भात जाणीव जागृती म्हणून सकल हिंदू समाज राम भक्त बांधवांनी गावागावात, वाड्यावर जाऊन घरोघरी मंगल अक्षदा दिल्या होत्या. जाणीव जागृती केली होती. त्या अनुषंगाने आज गावागावातील प्रत्येक मंदिरामध्ये उपस्थित राहून मनोभावे प्रभू श्रीरामाचा जय जयकार केला. प्रतिष्ठापणेचा आनंद सोहळा साजरा केला. गावोगावी महाप्रसाद वाटप केला. आणि ठिकठिकाणी महाप्रसाद म्हणून कोणी पेढे वाटप केले. कोणी 11 हजार लाडूचे वाटप केले. प्रारंभीही प्रतिष्ठापणेच्या बरोबर वेळेत महाआरती करण्यात आली.

सकल हिंदू समाज रामभक्त यांनी भूम शहरात प्रभू श्रीराम मंदिर, कसबा मारुती मंदिर, श्री क्षेत्र आलमप्रभू देवस्थान, अंबाबाई मंदिर, दत्त मंदिर, श्री चौंडेश्वरी मंदिर, श्री वरद विनायक मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, शेळके मारुती, हिरवा मारुती, काळा मारुती, झोलापूर मारुती, शिवाजीनगर मारुती, इंदिरानगर मारुती, बाजार तळ महादेव मंदिर अशा भूम शहरातील एकूण 22 मंदिरामध्ये महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला.

भूम शहराच्या गोलाई चौका नजिक असलेल्या स्थानकासमोर भव्य असे प्रभू श्रीराम प्रतिमाची प्रतिमेची पूजा केली. शिवाय प्रत्येक प्रवाशाला महाप्रसाद म्हणून लाडू तसेच प्रभू श्रीराम मंदिराचे फोटो व माहिती पत्रकाचे वाटप केले .यावेळी प्रत्येक प्रवाशाकडून तेवढेच उत्साही पणे स्वागत करून त्यांनी देखील प्रभू श्री रामाचा जयजयकार करून सकल हिंदू समाज प्रभू श्रीराम भक्तांच्या परिश्रमाला प्रतिसाद दिला. या दरम्यान महाप्रसाद वाटपा दरम्यान प्रभू श्रीराम की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा विविध प्रकारच्या जयघोषाने परिसर अगदी दणाणून गेला होता.

प्रत्येक मंदिरासमोर आकर्षक अशी रांगोळी काढून भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. संपूर्ण कार्यक्रमात दरम्यान बाळासाहेब क्षिरसागर, राम भक्त राजे विजयसिंह थोरात, संतोष सुपेकर, सचिन बारगजे, बाबासाहेब वीर, श्रीपाद देशमुख, हेमंत देशमुख, मनोज क्षिरसागर, सचिन क्षिरसागर, प्रदीप साठे,  गणेश कुलकर्णी, पत्रकार शंकर खामकर, किरण कुलकर्णी, अशोक लोखंडे, प्रभाकर गाढवे, प्रभाकर शेंडगे, संदीप खामकर, आबासाहेब मस्कर, गणेश साठे, विनोद नाईकवाडी, विनायक नाईकवाडी, प्रसाद देशमुख, मुकुंद वाघमारे, सचिन जाधवर, अमर सुपेकर, अशोक आसलकर, सुजित वेदपाठक, वैभव देवडीकर, शांतीराज बोराडे, स्वप्नील शहा, उदय कुलकर्णी, अप्पा सोनटक्के, सौ अश्विनी साठे,  शुभम खामकर, संदिप खामकर  अशा असंख्य रामभक्तांनी परिश्रम घेतले.


 
Top