तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील आर्य चौकातील प्राचीन प्रभुश्रीराम मंदिरात नव्याने प्रतिष्ठापीत करणाऱ्या येणाऱ्या श्रीराम, लक्षमण, सीता मुर्ती सोहळा पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 20 जानेवारी रोजी शहरात भव्य शोभा याञा काढण्यात आली.

सकाळी 10 वा येथील छञपती शिवाजी महाराज पुतळ्या परिसरात श्रीराम पादुका पुजन करण्यात येवुन त्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. त्यानंतर शोभायाञेस आरंभ झाला. या शोभा याञेत पारंपरिक वाद्य, उंट, घोडे समावेश होता.

तसेच महिला भजनी मंडळ हजारो शालेय विध्यार्थी, विध्यार्थींनी यात सहभागी झाले होते. ही शोभायाञा छञपती शिवाजी महाराज पुतळा ते महाध्दार चौक, शुक्रवार पेठ, पावणारा गणपती, आर्य चौक ते कमानवेस मार्ग याचा सांगता श्रीराम मंदिरात झाली. या शोभायाञेत रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायाञा दरम्यान पालखीतील पादुकाचे दर्शन, पुजन, आरती करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होते. यात काँग्रेसचे माजी मंञी  मधुकर चव्हाण यांनी  सहभाग नोंदवुन दर्शन घेतले. या शोभायाञा यशस्वीतेसाठी राम भक्त विशेषता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.  यावेळी भारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 
Top