कळंब (प्रतिनिधी)- दि. 22 जानेवारी रोजी अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे या पवित्र व मंगल दिनाच्या निमित्ताने कळंब तालुक्यातील दारू व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी निवेदनाद्वारे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र महिला शाखेच्या वतीने कळंबच्या तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर व हनुमंत कांबळे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळंब यांच्याकडे करण्यात आली आहे. 

या प्रसंगी हे निवेदन देण्यासाठी हभप. सुनीतादेवी अडसूळ महाराज, जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महिला विभाग धाराशिव एड. शकुंतला फाटक, कीर्तीमला लोमटे, महादेवी देशमुख, विजया पांचाळ, प्रेरणा नागटिळक, अशोक महाराज पवार, दिगंबर गिरे, संदीप कोकाटे, भागवत शिंदे, राजेंद्र जाधव, उद्धवराव धस, के. पी. अभंग, सचिन वाघमारे, राजेंद्र जाधव यांची उपस्थिती होती.


 
Top