धाराशिव (प्रतिनिधी)- तुझी कुवत काय आहे हे लोकसभेच्या एका पराभवानंतर जिल्ह्याला दिसुन आले. दुसऱ्याला बोलण्या अगोदर आपण आत्मपरीक्षण करा.पाच वर्षापुर्वी आपण कोणाचे होता, आज कोणाचे आहात व भविष्यात अजुन कोणाचे व्हाल याची खात्री नसणाऱ्यांनी मला बोलु नये असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांना लगावला. 

भुसंपादनाच्या प्रक्रियेत आपली कमीशन एजंटच धोरण राबवण्यात अडथळा आल्याने एवढा पोटशुळ सुटणं आम्ही समजु शकतो. शेतकरी प्रश्न विचारु लागले आहेत. त्यांना उत्तर द्यायच सोडुन आमच्यावर टिका करण्याने काय साध्य होणार आहे. आमची कुवत काढणाऱ्यांनी 40 वर्षात जिल्ह्याला दरीद्री यादीत पोहचवलं. अजुनही तुमचं पोट भरलेल नाही शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमीनीतही तुमचा स्वार्थ लपुन राहिलेला नसल्याचा घणाघात खासदार ओमराजे यांनी केला. त्यात आता माझ्या बाजुच्या लोकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता तुमच्यासारख्यांना भासु लागली. याच मी स्वागतच करतो अशी टिप्पणी ओमराजे यांनी केली. विमा प्रकरणी वारंवार पुरावे दिलेत व तुम्हाला लयच अक्कल असेल तर त्यावर थेट बोलायचे सोडुन अस मोघम बोलुन आपल्या सडक्या बुध्दीच प्रदर्शन कशाला दाखवताय असा सवाल ओमराजेंनी केला. आम्ही भाषणात काय बोललो यांचे टिपण घेताय म्हणजे आता तुमच्या पक्षाला विचारुन आम्ही बोलायच का? या असल्या धमकीला घाबरणारा शिवसैनिक नाही हे त्यांनी लक्षात ठेवाव असा इशारा ओमराजे यांनी दिला. दिल्लीत कशाला गेला होता हे सुध्दा आम्हाला ठाऊक आहे ते पण योग्यवेळी नक्कीच सांगु अन्‌‍ निवडणुक लढायला तर तुम्ही कायमच तत्पर असतात. दुसऱ्या कोणाला उमेदवारी मिळु नये यासाठी तुमची धडपड सर्वांच्याच लक्षात येत आहे. पक्ष बदलला म्हणजे आत्मकेंद्री स्वभाव बदलत नसतो असाही टोला ओमराजेंनी लगावला. माझी उमेदवारी जाहीर झाली नाही कारण तुमच्या पसंतीमुळेच ती मला मिळणार आहे अशा तोऱ्यात बोलुन आपली पावशेर अक्कल दाखवल्याचे सांगुन खासदार ओमराजे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.


 
Top