धाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने धाराशिव येथील पोलीस मैदानावर श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव - 2024 हे 18 ते 22 जानेवारी या कालावधीत सुरू आहे यामध्ये विविध प्रकारचे साहित्य शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची माहिती आधुनिक तंत्रज्ञान अशा अनेक  माहितीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नातून सुटका करण्यासाठी या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महोत्सवातील विविध क्षेत्राचा अभ्यास करून शेती फायद्याची करण्यासाठी उपयोगात आणता येईल, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवास उपस्थिती लावावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे.


 
Top