तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल  नार्वेकर जाहीर करताच शिवसेना शिंदे गटात खुशीचे तर उध्दव ठाकरे गटात गमचे वातावरण निर्माण झाले.  बहुतांशी सर्वसामान्यांनी  हा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया देवुन या निकालाने मतदारांना लोकशाहीत काहीच किंमत राहीली नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात  होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेवर झालेल्या सुनावणीचा फैसला  बुधवारी सांयकाळी लागला. शिवसेना आमचीच  म्हणणा-या दोन्ही शिवसेनेचा आज फैसला होवुन शिवसेना शिंदे गटानी अखेर बाजी मारल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या निकालाचा तुळजापूर विधानसभा मतदार संघावर तितकसा परिणाम होणार नसला तरी सताधारी शिवसेना शिंदे गट पक्षाच्या भविष्यासाठी हा निकाल महत्वाचा ठरणारा होता. त्यामुळे या निकालाने 2022 पासुन लागलेली उत्सुकता अखेर 2024 मध्ये संपुष्टात आल्याचे बोलले जाते. या निकालाचा तुळजापूर विधानसभा मतदार संघावर काय परिणाम होणार हे माञ निवडणुकांनी नंतर स्पष्ट होणार आहे. या निकाल्याने तुळजापूर विधानसभा मतदार संघात माञ शिवसेना शिंदे गट शिरकाव करण्यासाठी लाभ होणार आहे. याचा फटका माञ सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निकालाने फक्त शिवसेना शिंदे गटालाच फायदा होवुन इतरांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.


 
Top