धाराशिव (प्रतिनिधी)-सरकारच्या अनेक योजना समाजहिताच्या असतात. एखाद्या विभागाचा विभागप्रमुख सामाजिक बांधिलकी मानून काम करणारे असले तर असे अधिकारी सरकारी योजनेच्या पुरेपर फायदा घेवून समाजहिताचे कामे करीत असतात. हेच पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी एका गुन्हेगाराला पहाट उपक्रमांतर्गत चांगला व्यवसायिक बनवला आहे. 

प्रदिप काशिनाथ कांबळे हा टॉवर कंपनीमध्ये काम करीत होता. काम करीत असताना त्याचे वेतन त्या टॉवर कंपनीने न दिल्याने तो गुन्हेगारीकडे वळला. प्रदिपने लहान मोठ्या चोऱ्या करण्यास सुरूवात केली. एका चोरीच्या प्रकरणात धाराशिव स्थानिक गुन्हा शाखेने त्यास रंगेहाथ पकडले. चौकशीच्या दरम्यान पुर्ण माहिती प्रदिपची घेतली. ही माहिती पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना दिली. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कुलकर्णी यांनी पारधी समाजातील अनेक परिवारांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्याप्रमाणे धाराशिवमध्ये झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पारधी समाजातील युवकांची स्वतः फी भरून स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सहकार्य केले. पहाट उपक्रम राबवून अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले. या अंतर्गतच पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रदिप कांबळे यास कोणता व्यवसाय तु करू शकतोस याची माहिती विचारली. यावर प्रदिप कांबळे याने बुटपॉलिस व बुट चप्पल दुरूस्तीची कामे करू शकतो. असे सांगितल्यानंतर पोलिस अधिक्षक यांनी त्यास आर्थिक मदत देवून सर्व सामान उपलब्ध करून दिले. 

दररोज चारशे रूपये कमाई

या संदर्भात प्रदिप कांबळे यांनी सांगितले की, पोलिस अधिक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने मी व्यवसाय सुरू केला असून, आज समाधानाने जगत आहे. बुटपॉलिस व बुट, चप्पल दुरूस्तीमधून मी दिवसाला 300 ते 400 रूपये कमवतो असे कांबळे यांनी सांगितले.


 
Top