तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे राजीव कॅम्पूटर यांच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे होते तर किरण गायकवाड, नरहरी बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेतील प्रथम विजेता वेदांत फंड, व्दितीय विजेती अक्षरा मारवाडकर, तृतीय विजेता संग्राम आबदारे यांना उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी संयोजक पवण लाकाळ यांनी स्पर्धेचा उद्देश सांगितला.सूत्रसंचलन एस.यू.गोडगे यांनी केले.यावेळी एस.एस.बळवंतराव, एल.टी.चव्हाण, एस.एस.पाटील, एस.एस.खटींग,ऐ.बी.नितळीकर, एस.आर.पिटील, एस.एस.सामटे, के.एस.सय्यद, एस.डी.घाडगे, आर.एम.देवकते, एस.टी.गांगुड, एस.बी.पाटील, व्ही.एम.भंडारे, आर.ऐ.साखरे, करण कांबळे उपस्थित होते.


 
Top