तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे तेरणा क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत पळसप ता.धाराशिव येथील सुभेदार क्रिकेट क्लब प्रथम विजेता ठरला.विजेत्या संघास युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
द्वितीय विजेता धाराशिव येथील अजिंक्य मातोश्री क्रिकेट संघ विजेता ठरला तर तृतीय विजेता तेर येथील रणझुंजार क्रिकेट क्लब विजेता ठरला.विजेत्या संघास युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धेसाठी उपसरपंच श्रीमंत फंड, विकास देशमुख,श्रीकांत लाड, सतिश कदम, अजित कदम, विरेंद्र आबदारे,अमर नाईकवाडी, संतोष थोडसरे, सिद्धांत आंधळे, विजय पडूळकर, विनोद जाधव, नरेंश चंदले तेरणा क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.