तेर (प्रतिनिधी)- वार्षिक स्नेहसंमेलनाने विद्यार्थी, विद्यार्थीनीच्या कलागुणांना वाव मिळातो असे प्रतिपादन मंडल अधिकारी दत्ता कोळी यांनी केले.       

धाराशिव तालुक्यातील तेर येथील लिटल फ्लोअस स्कूल यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी  पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, उपसरपंच श्रीमंत फंड,जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम, राहुल माकोडे, बिभीषण शिराळ, ज्योती पवार, सुमित्रा आबदारे,अंबादास जाधव, भैरवनाथ भोंगळ,यांची प्रमुख उपस्थिती होती.याच कार्यक्रमात गरीब कुटुंबांतील तीन मुलींना सायकलींचे वाटत करण्यात आले.प्रास्ताविक प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तानाजी पिंपळे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी रत्नमाला पिंपळे, चव्हाण सुप्रिया, पांचाळ रूपाली, रीतापुरे अश्विनी, व्हरकटे दीदी, गाढवे माधुरी, नायकवडी स्वाती, मुळे सुप्रिया, पाटील स्वाती, सुरेखा पिंपळे, गडकर कौशल्या,  राजकुमार थोडसरे ,नामदेव गायके, धनंजय पवार, संतोष पिंपळे, केशव सलगर, सारंग पिंपळे, धीरज नाईकवाडी,करण पांढरे, ओमकार रोहिदास यांनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने पालक, नागरिक उपस्थित होते.


 
Top