तेर (प्रतिनिधी)-बापूजी सेवा मंडळ धाराशिव यांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील तेर येथे आयोजित मातृ पितृ पूजन व तुलसी पूजन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तेर येथे दुपारी मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.सायंकाळी जिल्हा परिषद पेठ प्रशालेच्या प्रांगणात आयोजित मातृ पितृ पूजन व तुलसी पूजन कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी श्री रामा भाई यांचा संत्सग संपन्न झाला.यानंतर मातृ पितृ पूजन व तुलसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.कार्यक्रमासाठी गुरूनाथ कोळपे,संजय तिवारी, बाबा परीट, अविनाश समुद्रे, विठ्ठल गायकवाड, संतोष तिवारी, तेरकर भाई व साधकांनी परिश्रम घेतले.


 
Top