तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा तेर येथे शिकाऊ उमेदवाराचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा तेर येथे एक वर्षापूर्वी इलेक्ट्रिशन व वायरमन शिकाऊ उमेदवार म्हणून रोहीत उंबरे, तुषार गजधने, वैष्णवी इंगळे, कौशल्य कुंभार, चंद्रजित राऊत यांनी काम केले.त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा तेर यांच्या वतीने शिकाऊ उमेदवाराचा सत्कार उप कार्यकारी अभियंता एस.एस.स्वामी व सहाय्यक अभियंता एस.व्ही कोळ्ळे यांच्या हस्ते करण्यात आला.


 
Top