तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद सप्ताह अंतर्गत महिला आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. वसुधा दापके देशमुख, स्त्री रोग तज्ञ, शासकीय रुग्णालय, धाराशिव यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. 

उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. फास्ट फूड खाण्यापेक्षा पालेभाज्या, कडधान्य आहारात घेणे गरजेचे आहे. चुकीच्या गोष्टींना वेळीच विरोध करणे गरजेचे आहे.  या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समपन  प्र प्राचार्य डॉ डोके यांनी केले.विवेकानंद सप्ताहाच्या समपनाप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ. अशोक मर्डे, हिंदी विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर, श्री महेंद्र कावरे हे परिक्षक म्हणून लाभले. तसेच स्वामी विवेकानंदांचे जीवन व कार्यावर आधारित भित्तीपत्रका तुतारी अंकाचे देखील यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर प्रोफेसर डॉ. यशवंतराव डोके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. धनंजय लोंढे, प्रा.डॉ.  मंत्री आर. आडे, प्रा. श्रीमती एस. एम. कदम, प्रा. वसावे, प्रा. श्रीमती मगरे एस.एन, प्रा. श्रीमती के. एस. कदम, प्रा.ग्रंथपाल दिपक निकाळजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ प्रोफेसर यशवंतराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top