धाराशिव (प्रतिनिधी)- शेवटच्या माणसाच्या परिवर्तनासाठी, त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीशी निगडित उद्योग यांची उभारणी करत असून, याद्वारे रोजगार निर्मिती व  उस उत्पादक, दूध उत्पादक यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच बँकिंगच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना,  उद्योग समुहाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार असल्याचे मनोगत ॲड. व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केले. 

यावेळी तुळजापूर विधानसभा सदस्य राणाजगजीत सिंह पाटील, धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, सुधीर पाटील, संजय पटवारी यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. रूपामाता इरा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वाढदिवस समारंभाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सहकार, वैद्यकीय, विधी, पत्रकार यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक व दूध संकलक, मित्र आप्तेष्ट, कौटुंबिक सदस्य, हितचिंतक यांनी गुंड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रूमापाता नॅचरल शुगरच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर संस्थेच्या काही शाळेत आनंद मेळावा साजरा करण्यात आला. 

रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व रुपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने गुंड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन यशस्वी करण्यासाठी रूपामाता उद्योग समूहाचे  अजित गुंड, मिलिंद खंडेकर, सत्यनारायण बोधले, ॲड. शरद गुंड, गजानन पाटील, तुषार पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले.


 
Top