धाराशिव (प्रतिनिधी)-येथील शिंगोली आश्रम शाळेत मुख्याध्यापक कुमंत शिंदे व शिक्षिका श्रीमती सुनिता व्यवहारे मॅडम यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी आदर्श शिक्षक सतीश कुंभार यांनी मुख्याध्यापक कुमंत शिंदे व श्रीमती व्यवहारे मॅडम यांना शिवराज्याभिषेक सोळ्याची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण व प्रमुख पाहुणे विकास चव्हाण, प्राचार्य भालचंद्र हुच्चे, प्राचार्य संदिपान कुंभार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य भालचंद्र हुच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक कुमंत शिंदे व श्रीमती व्यवहारे मॅडम यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य संदिपान कुंभार यांनी भारतीय शिक्षण पद्धती ही रामायण व महाभारत काळापासूनच आश्रम पद्धतीचे आहे. गुरुच्या आश्रमातच जाऊन भगवान श्रीकृष्ण यांनी शिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक कुमंत शिंदे व श्रीमती सुनीता व्यवहार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील रत्नाकर यांनी केले. दीपक खबोले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमासाठी येडशी बीटचे विस्ताराधिकारी प्रकाश पारवे व शाळेतील पर्यवेक्षक शेख अब्बास अली, नागनाथ पाटील, चंद्रकांत जाधव, सूर्यकांत बडदापुरे, चित्तरंजन राठोड, सचिन राठोड, विशाल राठोड, प्रशांत राठोड, मदन कुमार अहमदापुरे, श्रद्धा सूर्यवंशी, सुरेखा कांबळे, ज्योती राठोड साने मॅडम व कर्मचारी गोविंद बनसोडे, सचिन माळी, अविनाश घोडके, सागर सूर्यवंशी, मस्के भिकाजी, रेवा चव्हाण व विद्यार्थी व हिंगोली तांडा, शिंगोली गाव व परिसरातील मोठ्या प्रमाणात पालक वर्ग व नागरिकांची उपस्थिती होती.