धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा धाराशिव येथे दि.01 जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच भूम, परंडा, वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे भूम, परंडा, वाशी विधानसभा कार्याध्यक्षपदी किरण पाटील तसेच भूम तालुक्यातील माणकेश्वर जि.प.गट प्रमुख या पदावर वीरेंद्र पाटील यांची जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भूम तालुक्यातील देवळाली व माणकेश्वर येथील युवकांचा पक्षांमध्ये जाहीर रित्या पक्ष प्रवेश झाला. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेब यांचे उत्कृष्ट कार्य पद्धती तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांचे जिल्ह्यातील व भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या विधानसभा क्षेत्रातील नेतृत्वावर विश्वास ठेवत देवळाली,माणकेश्वर ता. भूम येथील युवकांनी पक्षांमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार दिवसागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी व पक्ष प्रवेश करण्यात येत असून पक्ष संघटन व बांधणीसाठी जिल्हाध्यक्ष व पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांचे कार्य जोरात चालू असल्याचे दिसून येते. नवनियुक्त विधानसभा कार्याध्यक्ष व जि.प. गटप्रमुख यांचा जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या सोबत भूम, परंडा, वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, सेवा दल विभाग जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, धाराशिव युवक तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,प्रताप शिंदे,अमोल हाजगुडे, लखन तांबे, विशाल तांबे, राजेभाऊ आरगडे, विनोद पाटील, बाबासाहेब मुळे, दिलीप डांगे, नामदेव मांडवे संतोष सर्वगोड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.