धाराशिव (प्रतिनिधी)-एकलव्य विद्या संकुल यमगरवाडी येथे गेले तीन दिवस दिनांक 26 ते 28 जानेवारी रोजी वस्तीग्रह विभागाच्या विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन एकलव्य विद्या संकुलाचे क्रीडा प्रमुख बालाजी शिरसागर सर, गोविंद सोमानी काका व काकू ,वस्तीग्रह अधीक्षक फुलाजी ताटी कुंडलवार वस्तीगृह महिला अधीक्षक संगीता पाचंगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पर्यवेक्षक सोनिया अंतरेड्डी ,सुजाता गणवीर ,मयूर अंतरेड्डी, यशवंत निंबाळकर ,ज्ञानेश्वर भुतेकर हे सर्व उपस्थित होते.
या तीन दिवसात विद्यार्थ्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला या स्पर्धा वस्तीग्रह पातळीवर घेण्यात आल्या व या स्पर्धेमध्ये वस्तीगृहात राहणाऱ्या सर्व मुला मुलींचा सहभाग त्यांनी नोंदवला होता या स्पर्धा तीन गटात घेतल्या गेल्या पहिला गट पहिली ते चौथी त्यांना लिंबू चमचा ,पोत्यातील उडी, 50 मीटर धावणे आणि संगीत खुर्ची दुसरा गट पाचवी ते सातवी त्यांना 100मी, 200मी, 400मी, 600मी धावणे, खोखो कबड्डी व शूटिंग बॉल व तिसरा गट आठवी ते दहावी त्यांना 100मी, 200मी, 400मी, 800मी धावणे, खोखो कबड्डी व शूटिंग बॉल आशा विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा एकलव्यविद्या संकुलात अतिशय आनंदी वातावरणात पार पडल्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर खूप आनंदाचे वातावरण होते. या क्रीडा स्पर्धा आपले शरीर निरोगी राहण्यासाठी व खेळांचे महत्त्व लक्षात यावे व मुलांचे मनोरंजन व्हावे यासाठी या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते या क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे सर व अण्णासाहेब कोल्हटकर सर यांचे मार्गदर्शन लाभले व वस्तीग्रह विभागाचे दोन्ही अधीक्षक व पालक पर्यवेक्षक यांनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले.