भूम (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या वारे वाहू लागले असून त्या अनुषंगाने गाव पातळी वरील निष्ठवंत शिवसैनिकांनी भूमी पुत्र असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा मोठया मताधिक्याने निवडून आणण्यासाठी वज्रमुठ बांधावी असे आवाहन भूम, परंडा, वाशी युवासेना विधान सभा प्रमुख प्रल्हाद आडागळे यांनी केले आहे.
भूम तालुक्यामध्ये प्रत्येक गांव भेटी दौरा चालू असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकार करून धाराशिव लोकसभेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवून गद्दार यांना हद्दपार करण्यासाठी भूम तालुक्यामध्ये शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी वज्रमुठ आवळली आहे. त्या अनुषगाने गांव भेटी दौरा चालु असून त्यास मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज भूम तालुक्यातील तांबेवाडी येथील श्रद्धास्थान असलेले भगवान बाबाचे दर्शन घेऊन गाव भेटी दौऱ्याला सुरुवात केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. त्यावेळी येथील नागरिकांनी शपथ पूर्वक खासदार ओमराजे निंबाळकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणणार असल्याचे विश्वास ग्रामस्थांनी दिला आहे. त्यानंतर माणकेश्वर येथे ज्येष्ठ शिवसैनिक यांची भेट घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या शिवदूत विश्वास सराफ, छोटू काका यांच्या स्वगृही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन वेगवेगळ्या राजकीय विषयावर चर्चा करून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा माणकेश्वर गावातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी विश्वास दिला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, उपतालुकाप्रमुख रामभाऊ नाईकवाडी, युवासेना शहरप्रमुख अविनाश जाधव, युवासेनेचे गोविंदराज शाळू, ॲड विनायक नाईकवाडी, सरपंच परिषद राज्य संघटक कोहिनूर सय्यद, शाखाप्रमुख तांबेवाडी राजाभाऊ संक्राती, संजय जाधवर, शिंदे, हभप. संतोष मुंडे महाराज,माजी सरपंच मुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मौजे शेकापूर येथील माजी सरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख साहेबराव हांडे यांच्या निवासस्थानी शेकापूर येथील ग्रामस्थां बरोबर चर्चा करून बैठक संपन्न झाली. रात्री उशिरापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचे पदाधिकारी आपल्या गावामध्ये येणार असल्याने ग्रामस्थ ठीक अकरा वाजेपर्यंत उपस्थित होते. बैठक संपन्न झाल्यानंतर रात्री उशिरा चहा पानाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित सर्व ग्रामस्थांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आभार मानले.