धाराशिव (प्रतिनिधी) - येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या 2024 च्या दिग्दर्शकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयते यांच्या हस्ते करण्यात आले.
धाराशिव शहरातील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा 35 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत साखरे, पुणे येथील विश्वेश्वर सहकारी बँकेचे सुनील हुकारी, राजेंद्र मुंडे (कळंब), सतीश निलकट (कोपरगाव), मुसारे व विजय चौंडे (लातूर), शिवानंद कथले, वैजनाथ गुळवे, अर्जुन साखरे, दीपक देवकते व व्यवस्थापक नवनाथ बचाटे आदी उपस्थित होते. यावेळी या संस्थेचे भाग भांडवल 2 कोटी 23 लाख रुपये असून राखीव व इतर निधी 3 कोटी 28 लाख रुपये आहे. तर ठेवी 34 कोटी रुपये व 16 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच कर्जदारांना 24 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तर खेळते भाग भांडवल 41 कोटी रुपये असून संस्था सतत नफ्यात असून संस्था वर्गामध्ये आहे. तसेच संस्थेच्या सभासदांना 9 टक्क्यांप्रमाणे लाभांशाचे वाटप चालू असल्याची माहिती अध्यक्ष साखरे यांनी दिली.