कळंब (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्द व चिकाटीने अभ्यास करून यश संपादित करावे. सेवा हाच धर्म मानून समाजाची आणि राष्ट्राची सेवा करावी. तसेच स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून प्रथम स्वतःचा नंतर गावाचा आणि नंतर देशाचा विकास करावा असे आवाहन तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबीर डिकसळ येथे आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उ्दघाटक म्हणून तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश साबळे पोलीस निरीक्षक कळंब, प्रमुख उपस्थिती मध्ये ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर आणि प्रो. संजय कांबळे, अधिसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी विद्यार्थ्यांनी पदवीच्या प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून जीवनात यशस्वी व्हावे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिराच्या माध्यमातून स्वतःचे जीवन संस्कारमय घडवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, प्रो. संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नामानंद साठे यांनी तर प्रास्ताविक डॉ.मीनाक्षी जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉ. हरिभाऊ पावडे यांनी मानले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप महाजन, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा. अर्चना मुखेडकर, प्रा.सरस्वती वायभसे, प्रो. ज्ञानेश चिंत्ते, प्रो .दादाराव गुंडरे, प्रो. दीपक सूर्यवंशी, डॉ. कमलाकर जाधव, डॉ. दत्ता साकोळे, डॉ. सुरेश वेदपाठक, डॉ. नागनाथ आदाटे, डॉ. ईश्वर राठोड, डॉ. श्रीकांत भोसले, डॉ. विश्वजित मस्के आदीसह प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.