धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते येडशी दरम्यान चोरटे परत सक्रीय झाले असून, 5 नोव्हेंबर 2023 पासून ते 17 जानेवारी 2024 पर्यंत फिर्यादी दिनेश शिवराज गवशेट्टी यांच्या तीन ट्रकची ताडपत्र्या फाडून 2 लाख 9 हजाराचा माल पळविल्याची तक्रार गवशेट्टी यांनी येरमाळा पोलिस स्टेशनला दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दिनेश शिवराज गवशेट्टी, वय 38 वर्षे, रा. 124/3 रेल्वे लाईन काडादी चाळ सोलापूर हे दि. 05.11.2023 रोजी 03.00 वा. सु. संभाजीनगर ते सोलापूर येथे ट्रक क्र. केए 25 एए 6389 मधील टी एस नं 128286935 मध्ये माल भरुन जात होते. दरम्यान मलकापूर ते येडशी एनएच 52 हायवे रोडवर ट्रक मधील लेडीज ड्रेस मटेरियल अंदाजे 54 हजार 509 रूपये किंमतीचे, ट्रक क्र. केए 25 एए 4220 जि सी 1079251269 मधील लेडीज ड्रेस मअेरियल अंदाजे 10 हजार 238 हजार किंमतीचे, गाडी क्र. के.ए 25 एए 6881 मधील पुरुषाचे शर्ट, शिगारेट, सोनपापडी, लेडीज शर्ट, छत्रीच्या काड्या असा एकुण 2 लाख 09 हजार 315 रूपये किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने तिनही ट्रकवर चढून ताडपत्र्या फाडून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी दिनेश गवशेट्टी यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलिस ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top