उमरगा (प्रतिनिधी) -मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तुगाव येथील मुंबई येथे कार्यरत असलेले सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्ते तथा उद्योजक, व्यावसायिक, कलावंत मधुकर माने यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये दि. 17 जानेवारी रोजी प्रवेश झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, लोहारा तालुका उपाध्यक्ष प्रशांत सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमरगा तालुक्यातील तुगाव येथील रहिवाशी तथा मुंबई येथे विविध सामाजिक संघटना व चळवळी मधून कार्यरत असलेले पदाधिकारी, व्यावसायिक उद्योजक तथा चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले दिग्दर्शक कलावंत मधुकर कृष्णा माने यांनी अजित पवार यांच्या कार्यावर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा स्वीकारली आहे. ते अखिल भारतीय लहुजी साळवे संघटना धाराशिव जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतात. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेचे माजी राज्य उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गट महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहिले आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे उमरगा तालुका, जिल्हा व मुंबई येथेही अनेक कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील मधुकर माने यांच्या प्रवेशाप्रसंगी कल्लाप्पा गाडेकर, आष्टा कासार माजी उपसरपंच तानाजी कागे, राहुल भोसले यांचाही प्रवेश संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.