तुळजापूर (प्रतिनिधी) - आयोध्येतील नवनिर्मित मंदिरात दिनांक 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे. या भव्य दिव्य सोहळ्या निमित्त देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सोहळा दिवाळी सणासारखा साजरा करावा व देशातील गावागावातील शहरातील मंदिरे स्वच्छ करावे असे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने आज शहरातील पावणारा गणपती चौका लगत हनुमान मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांच्या मार्गदर्शन खाली हनुमान मंदिर पाण्याने धुवुन स्वच्छता करण्यात आले. नंतर हनुमानची आरती करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.


 
Top