धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना आणि लेडीज क्लबच्या अध्यक्ष असताना जेवढे कार्यक्रम घेण्यात आले तेवढ्या कार्यक्रमातील उणिवा दाखवून पत्रकारांनी योग्य प्रसिध्दी दिली. पत्रकारांच्या सहकार्यामुळे प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात यश मिळाले, असे प्रतिपादन लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी केले.

लेडीज कल्बच्या मैदानावर चालू हिरकणी महोत्सवामध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अर्चना पाटील यांच्यावतीने पाच दिवस हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दि. 6 जानेवारी रात्री किर्तनाच्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा अर्चना पाटील यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनिता गुंजाळ व इरशाद काझी यांनी केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनभूमी दिली

यावेळी शिवलिलाताई पाटील यांचे किर्तन झाले. आपले राज्य, आपला देश, आपल्या संस्कृतीचा स्वाभिमानचा ठेवा आणि हे राज्य थोर संत, महात्मे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पावनभूमी आहे. शिवराय जन्माला आले म्हणून त्यांच्या पुण्याईने आपण सुखी समाधानी जीवन जगत आहोत. स्त्रियांमध्ये पुरूषापेक्षा अधिक सामर्थ्य, व्यवस्थापनाची क्षमता आहे, असे प्रतिपादन युवा किर्तनकार शिवलिलाताई पाटील यांनी केले. आपल्या धर्मात पावित्र्य, अध्यात्म व संस्कृती आहे. त्यामुळे भक्तीमार्गाने निर्व्यसनी व शाकाहरी राहून आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगा, असे आवाहन त्यांनी केले. 


 
Top