धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वतीने श्रीराम मंदिर, तुळजापूर येथे मकरसंक्राती निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहर व परिसरातील महिलांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक महिलेस वाण म्हणून प्रभू श्रीरामाची मूर्ती तसेच आई तुळजाभवानी मातेचे विविध रूपे असलेले कॅलेंडर भेट म्हणून देण्यात आले. जवळपास 2,000 पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतला.  

अर्चनाताई पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. येत्या 22 तारखेला होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करायचा असून त्यावेळी सर्व महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विशाल रोचकरी, नरेश अमृतराव, सुहास साळूंके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, अभिजीत कदम, विजय कंदले, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर कदम व माता-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top