भूम (प्रतिनिधी)-आयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून माणकेश्वर तालुका भूम येथील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरात भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. या मोहिमेमुळे भाविक वर्गातून समाधान व्यक्त केले आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 14 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान विविध मंदिरांमध्ये श्रमदान करण्यात येत आहे. तसेच 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून, मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी मौजे माणकेश्वर ता.भूम येथील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेतून परिसर अगदी चकाचक करण्यात आला. या मोहिमेचे भाविक वर्गातून स्वागत होत आहे . परिसर स्वच्छ केल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

या स्वच्छता मोहीमेत भारतीय जनता पार्टी प्रदेश निमंत्रित सदस्य व भूम परांडा वाशी विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, वाशी तालुका सरचिटणीस सुधीर घोलप, भूम तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, समाधान अंधारे, अ.जा.मोर्चा तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अब्दुला लहाजी , युवा तालुकाध्यक्ष गणेश भोगील, भूम तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, तालुका चिटणीस संतोष औताडे, भूम शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, अमोल बोराडे, श्रीपाद देशमुख, रवी सुरवसे, सुरेश जगदाळे, विजय अंधारे, अनिल निमटेक, बाळासाहेब आडसूळ, किशोर किरमे, अतुल अंधारे, संतोष बनगर, अली अद्रुस, शामराव अंधारे, बापू बगाडे, महेबूब शेख आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्य उपस्थित होते.


 
Top