धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्हाभरात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. त्यानिमित्त सोमवारी (दि.1) लोहारा येथील कार्यालयास भेट देवून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष दुधगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी लोहारा येथील राजेंद्र कदम, माधव पाटील, नरदेव कदम, भालचंद्र बिराजदार, सुनिल ठेले, राजेंद्र लोमटे, व्यंकट विरोधे, मिलींद नागवंशी, बाळासाहेब पाटील, शब्बीर गवंडी, शंकर कदम, संजय सुर्यवंशी, मुबारक गवंडी, रहिम शेख, मिजाज जाउस, लक्ष्मण रसाळ, अभिजित लोभे, नवाज सय्यद आदींची उपस्थिती होती.


 
Top