धाराशिव (प्रतिनिधी)-20 जानेवारी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडी नियोजन संदर्भात मराठा समाजाशी संवाद व संपर्क यासाठी धाराशिव येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सकल मराठा समाज चे जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मराठा बांधवांच्या उपस्थितीत सोमवार (दि.1 जानेवारी) रोजी करण्यात आले.

 यावेळी 20 जानेवारीच्या जरांगे पटलांच्या पायी दिंडी ला वाढता लोकप्रतीसाद पाहता  जास्त मोठे नियोजन होण्यासाठी नियोजन फॉर्म चे लोकार्पण यावेळी करण्यात आले. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही ही पद्धतीने हा  फॉर्म भरण्याची सोय यामध्ये करण्यात आली आहे तसेच गावोगावी जाऊन या फॉर्मचे वाटप व फॉर्म चे मोबाईलवरील  लिंक ची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. समाज बांधवांच्या विविध टीम द्वारे जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट, गण व गावो गावी जाऊन जनजागृती व प्रसिध्दी मराठा बांधवांन तर्फे करण्यात येणार आहे असा निर्धार करण्यात आला, यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

 

 
Top